पुन्हा एकदा धोनीच, आता मलिंगा रूपांत

टीम इंडियाचा माजी कप्तान माही उर्फ महेंद्रसिंग धोनी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. मग ती त्याची विकेटकीपिंग असो, बॅटिंग असो, त्याच्या कार, बाईक्सचा संग्रह असो, भारतीय सेनेतील त्याची देशसेवा असो, सेंद्रीय शेती असो किंवा कडकनाथ कोंबडी पालन असो. सोशल मीडियावर त्याचे रोजच नवे फोटो व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी बौद्ध संन्यासी वेशातील त्याच्या फोटोने अशीच धमाल उडविली होती. आता त्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर असाच व्हायरल झाला आहे.

Cwc11 Rwind नावाच्या ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. त्यात श्रीलंकन बोलर लसिथ मलिंगा प्रमाणे कुरळ्या केसाच्या बटात धोनीचे दर्शन होते आहे. यामुळे धोनीचे चाहते हैराण झाले आहेत. दोन दिवसापुर्वीच्या फोटोत धोनी मुंडण केलेल्या रुपात आहे आणि या फोटोत भरमसाठ केस असलेल्या रुपात आहे.

अर्थात हा फोटो २०११ क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळचा असावा कारण धोनीच्या अंगातल्या जर्सीवर आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०११ लिहिले आहे. वास्तवात धोनी सध्या २०२१ आयपीएल जिंकण्यासाठी जोरदार तयारी करतो आहे. चेन्नई येथे त्याचा सराव सुरु आहे. फोटो देणाऱ्या युजरने कॅप्शन मध्ये ‘हेलीकॉप्टर शॉट, स्लीप कॅच, डीपिंग योर्कर, तो सगळे काही करू शकतो. हा आहे एमएस मलिंगा’ असे लिहीले आहे.