हे ट्रांझेक्शन अॅप्स Google ला सुद्धा देतात धोका


तुम्ही जर ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रांझेक्शनचा वापर करत असाल, तर आता तुम्हाला पूर्णपणे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण सध्या काही असे खतरनाक अॅप्स बाजारात आले आहेत, जे गुगलला सुद्धा धोका देऊन तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुमच्या मोबाईलमध्ये जर असे अॅप असतील तर ते तात्काळ डिलीट करा.

मीडिया रिपोर्टनुसार काही अशा खतरनाक मॅलिसियस अॅप्सला चेक प्वाइंट रिसर्चमध्ये ओळखले आहे. जे तुमच्या फायनेंशिअल ट्रांझेक्शन धोकादायक असल्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे काढून घेतले जाऊ शकतात.

आपण जर आपल्या स्मार्टफोनमध्ये केक व्हीपीएन (cake vpn), पॅसिफिक व्हीपीएन (pacific vpn), ईव्हीपीएन (EVPN), बीटप्लेअर (Bit player), क्यूआर / बारकोड स्कॅनर मॅक्स (barcode scanner max), म्युझिक प्लेयर (Music player) आणि टूलटिप्नेटरलिबरी (Tooltipster liberty) अ‍ॅप डाऊनलोड केले असतील. तर ते तुम्हाला कधीही नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्यांना आपल्या फोनमधून काढून टाका. या अॅप्सद्वारे हॅकर्स तुमचे बँक तपशील चोरू शकतात.

हे सर्व मॅलिसियस अॅप्स अँड्रॉईड अॅप्स आहेत. रिपोर्टनुसार हे अॅप्स Clast82 नावाच्या ड्रॉपरने प्रभावित आहेत, जो यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये AlienBot Banker आणि MRAT हे मालवेअर इन्स्टॉल करतो.

AlienBot Banker मालवेअर म्हणजेच हा एक व्हायरस आहे, जो फायनेंशिअल अॅप्समध्ये जाऊन तुमचा तपशील चोरी करतो. हा व्हायरस एवढा जलद फास्ट आहे की तो गुगलच्या नजरेत सुद्धा येत नाही. एवढेच काय तर तो व्हायरस टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोडला ही चकमा देतो.

जर तुम्ही फायनेंशिअल ट्रांझेक्शन मोबाईल वरुन करत असाल, तर त्यामध्ये नेहमी ऑफिशियल अॅप्सच ठेवा. कोणताही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या अॅपच्या ऑफिशिअल वेबसाईटवर दिलेल्या लिंकवरुनच तो अॅप डाऊनलोड करा. स्मार्टफोन आणि अॅप्सला अपडेट करत रहा. फायनेंशिअल अॅप्सला लॉक ठेवा आणि कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला डाऊनलोड करु नका.