मर्सिडीजची लक्झरी E-Class फेसलिफ्ट भारतात लाँच


मुंबई : आज आपले ई-क्लास फेसलिफ्ट मॉडेल मर्सिडीज बेंझने (Mercedes-Benz) भारतात लॉन्च केले आहे. ही लक्झरी सेडान कार कंपनीने 63.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किंमतीत बाजारात सादर केली आहे.

मर्सिडीज-बेंझ ई-क्लास फेसलिफ्ट मॉडेलच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे झाले तर या कारचा फ्रंट लुक बऱ्यापैकी अपडेट केला आहे. या कारच्या बम्परसह नवीन ग्रिल आणि रिडिजाइन्ड एलईडी हेडलॅम्प दिले आहेत. साइड प्रोफाइलमधील बदलांबद्दल बोलायचे झाल्यास त्यात केवळ 17 इंचाचे अलॉय व्हील्स जोडले आहेत. त्याचबरोबर मागील बाजूस नवीन टेललाइट्स बसविण्यात आल्या आहेत.

2021 Mercedes-Benz E-Class फेसलिफ्टच्या इंटिरियरबद्दल सांगायचे झाले तर यात एक नवीन MBUX (मर्सिडीज-बेंझ युझर एक्सपीरियन्स) मल्टीमीडिया सिस्टम आहे. जी ‘Hey Mercedes’ व्हॉईस कमांड फीचरवर काम करते. यासह यामध्ये दोन यूएसबी पोर्ट देखील देण्यात आले आहेत आणि रिअर-सेंटर टचस्क्रीन कन्सोल देखील देण्यात आले आहे. त्याचवेळी, मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक जागा मिळेल.

या लक्झरी सेडानचे इंजिन आधीच्या इंजिनसारखेच पर्याय मिळतील, ज्यामध्ये 2.0 लीटरचे-सिलेंडर इन-लाइन पेट्रोल इंजिन मिळेल ज्यामध्ये 194hp पॉवर आणि 320Nm टॉर्क जनरेट होईल. त्याच वेळी, 2.0 लीटर 4-सिलेंडर इन-लाइन डिझेल इंजिन दिले गेले आहे, जे 192hp पॉवर आणि 400Nm ची टॉर्क निर्माण करते, तसेच यामध्ये तिसरे 3.0 लीटर डिझेल इंजिन असेल. यासह, तुम्हाला -स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन मिळेल.

या कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये नवीन मर्सिडीज-बेंझ ई-क्लास फेसलिफ्टमध्ये सात एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, TPMS, पार्कट्रॉनिकसह पार्किंग असिस्ट, अ‍ॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट आणि 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. ही कार कंपनीने डिझाईनो हयाकिंथ रेड, पोलर व्हाइट, ओबसिडीयन ब्लॅक, हायटेक सिल्व्हर, मोजावे सिल्व्हर आणि सेलेनाइट ग्रे अशा 6 रंगांमध्ये सादर केली आहे.