अमेरिकेत वेगाने सुरु होताहेत बीटकॉइन एटीएम

अमेरिकेत बीटकॉइनसह अन्य क्रिप्टोकरन्सीचा वापर वेगाने वाढला असून त्यामुळे मोठ्या संख्येने बीटकॉइन एटीएम सुरु झाली आहेत. अगदी सिगारेटच्या दुकानापासून पेट्रोल पंपावर सुद्धा ही एटीएम बसविली गेली आहेत. सध्या या आभासी मुद्रेचा दर १ बीटकॉइन साठी ५८ हजार डॉलर्स वर गेला आहे. गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत बीटकॉइनचा वापर वाढत चालला आहे.

अमेरिकेत वापर वाढल्याने कियोस्क ऑपरेटर क्वाइनफिलीफ व कॉइन क्लाऊड यांनी हजारो एटीएम बसविली आहेत. अगदी छोट्या दुकानात सुद्धा अशी एटीएम बसविली जात आहेत. येथेही बीटकॉइनच्या खरेदी विक्रीची सुविधा पुरविली जात आहे. ऑनलाईनवरून सुद्धा बीटकॉइन खरेदी करता येत आहे.

हौमेनीबीटकॉइन एटीएम डॉट कॉमच्या माहितीनुसार जानेवारी पर्यंत अमेरिकेत २८१८५ बीटकॉइन एटीएम होती, त्यातली १० हजार केवळ पाच महिन्यात बसविली गेली होती. नवीन व्यवसाय क्षेत्रात त्याचा वापर वाढताना दिसतो आहे.