महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा पाहून पंतप्रधान मोदी करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा


मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा झालेला विस्फोट पाहून आता केंद्रातील मोदी सरकारचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता थेट मुख्यमंत्र्यांसोबतच स्वत: मोदी चर्चा करणार आहेत आणि राज्यातील कोरोना प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

आज राज्यात तब्बल 15,051 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. हा आकडा कालच्या तुलनेत थोडा कमी झाला असला तरी देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. देशातील सर्वात जास्त अॅक्टिव्ह केसेस असलेले सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्रातच असल्यामुळे राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्याचे मोठ आव्हान सरकारसमोर आहे.

दिवसरातील एकूण 15,051 नव्या प्रकरणांपैकी 1713 प्रकरणे मुंबईत आहेत. पुण्यात आज 1122 कोरोन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील आकडा वाढताच आहे, तर पुण्यातील केसेस आज कमी झाले आहेत. तर नागपूरने मात्र मुंबई, पुण्यालाही मागे टाकलं आहे. नागपुरात 2094 केसेस नोंदवले गेले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही टेन्शन वाढले आहे. कोरोनाचा धोका आणि कोरोना लशीबाबत ते आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मोदी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक करणार आहेत. 17 मार्च दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत.