सोशल मीडियाला आमिर खानचा अलविदा


नुकताच बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा वाढदिवस होऊन गेला. यावर्षी तो ५६ वर्षांचा झाला. त्याने या वाढदिवसाला एक संकल्प केला आहे. त्यामुळे कदाचित त्याच्या चाहत्यांची निराशा झाली असेल पण या मिस्टर परफेक्शनिस्टने काय आणि कशासाठी संकल्प केला याची पार्श्वभूमी तर जाणून घेऊ या…!

तर आपले चाहते, मित्रमंडळी सगळ्यांकडून आमिरने वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याने एक मोठी घोषणा केली आहे, आणि ती म्हणजे सोशल मीडिया सोडून जायची. आमिरने आपल्या ५६व्या वाढदिवशी ठरवले की आता सोशल मीडियाला अलविदा करुन आपले पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करायचे ठरवले आहे.

आमिर आपल्या चाहत्यांना निरोप देताना आणि त्यांचे आभार मानताना म्हणतो, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाला माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या सगळ्याने माझे मन भरून येत आहे. तो पुढे म्हणाला, सोशल मीडियावरची ही माझी शेवटची पोस्ट असेल. तसे देखील मी फारच सक्रिय होतो सोशल मीडियावर पण तरीही मी येथून रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या ऑफिशिअल टीमचे हँडल शेअर करत आता यावरून आपण त्याच्याबद्दलचे अपडेट्स मिळतील, असेही तो म्हणाला.

आमिरने २०१८मध्ये त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले होते. आमिरने या पूर्वीही कम्युनिकेशन डिटॉक्स म्हणत बराच काळ आपला फोन पूर्णपणे स्वीच ऑफ ठेवला होता.