या देशात घरांपेक्षा अधिक आहेत कार्स

जगात अनेक श्रीमंत देश आहेत. अश्या देशातून महागड्या कार्स दिसणे, बडे बडे बंगले, हवेल्या दिसणे ही आम बात आहे. मात्र श्रीमंत देशाच्यात सामील असूनही घराच्या संख्येपेक्षा कार्सची अधिक संख्या असलेला देश आहे बृनोई. समुद्रात वसलेला हा देश आजही राजतंत्रानुसार चालतो. या देशात सुलतानाचे शासन आहे. हस्सानाल बोल्किया असे येथील सुलतानाचे नाव आहे. बृनोई मुस्लीम देश आहे.

या देशात प्रती हजार माणसांच्या मागे ७०० कार्स आहेत. देशात जितकी घरे आहेत त्यापेक्षा कार्सची संख्या जास्त आहे. या मागे स्वस्त पेट्रोल हे कारण आहे तसेच नागरिकांना वाहतूक कर भरावा लागत नाही हेही कारण आहे.

सुलतान हस्सानाल बोल्किया हा जगातला श्रीमंत सुलतान असून त्याची संपत्ती १३६३ अब्ज आहे असे सांगितले जाते. त्याला तीन बायका आणि १२ मुले आहेत. या देशातील आणखी एक वेगळी प्रथा म्हणजे येथील घरातील भिंतीवर बायकोचा फोटो लावला जातो. एखाद्याला एकापेक्षा जास्त बायका असतील तर सगळ्या बायकांचे फोटो भिंतीवर लावले जातात शिवाय सुलतानाचा फोटो सुद्धा भिंतीवर लावला जातो. देशात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी आहे तसेच रस्त्यातून जाताना खाणे चुकीचे मानले जाते. फास्ट फूड येथील नागरिकांना पसंत नाही.