जगभरातील विविध देशांमध्ये आहेत ७ हजार भारतीय कैदी

कर्ज बुडवून परदेशात फरारी झालेल्या निरव मोदी, विजय मल्ल्या यांना देशात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच जगभरातील विविध देशात ७ हजार भारतीय कैदी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही आकडेवारी दिली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२० अखेर परदेशी तुरुंगात ७१३९ भारतीय कैदेत आहेत.

अर्थात हा आकडा या पेक्षा मोठा असू शकतो कारण ज्या देशांबरोबर भारत सरकारने माहिती देवाण घेवाण करार केला आहे त्यानुसार मिळालेली ही माहिती आहे. ज्या देशांबरोबर असा करार झालेला नाही तेथील माहिती मिळू शकलेली नाही. परदेशातील तुरुंगात बंद असलेल्या भारतीयांची सर्वाधिक संख्या सौदी येथे आहे. तेथील तुरुंगात १५९९ भारतीय कैदी आहेत. तस्करी, लैंगिक शोषण, मद्यपान, मारामारी. लाच, अमली पदार्थ अश्या अनेक आरोपांचा त्यात समावेश आहे. ४५ कैद्यांवर हत्येचा आरोप आहे. मात्र ही संख्या २०१९ च्या तुलनेत कमी आहे. त्या वर्षी १८११ भारतीय कैदी होते.

युएईच्या कुवेत तुरुंगात ५०० भारतीय कैदी असून शेजारी पाकिस्तान मध्ये सर्वात कमी म्हणजे ६२ भारतीय कैदी आहेत. नेपाळ मध्ये ८८६, चीनमध्ये १४४ तर श्रीलंकेत ८३ व बांगलादेश तुरुंगात १७८ भारतीय कैदी आहेत.