या तारखेला होणार नीट (National Eligibility Cum Entrance Test) परीक्षा


मुंबई : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021′ (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून यंदा परीक्षा 1 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.

ही परीक्षा NEET (UG) 2021 MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार असून ही परीक्षा इंग्रजी हिंदीसह 11 भाषेत घेण्यात येणार आहे. ऑफलाईन परीक्षेचे 1 ऑगस्टला आयोजन करण्यात आले आहे.

नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा, अभ्यासक्रम व अर्ज भरण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्जाबाबत लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी

  • https://nta.ac.in
  • https://ntaneet.nic.in/Ntaneet/Welcome.aspx