काश्मीर विद्यापीठात प्रथमच खुलेआम फडकला तिरंगा

मोदी सरकारने दहशतवादाने पोखरलेल्या जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यावर काश्मीर मधील परिस्थिती निश्चित सुधारत असल्याचे दिसून आले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच काश्मीर विश्वविद्यालय परिसरात खुलेआम तिरंगा फडकाविला गेला असून यावेळी राष्ट्गीत सुद्धा म्हटले गेले. शुक्रवारी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिन महोत्सवाची सुरवात देशभर केली गेली त्यावेळी हा कार्यक्रम श्रीनगर मध्ये साजरा झाला. जम्मू काश्मीरला सुद्धा स्वातंत्र मिळून ७५ वर्ष होत आहेत पण प्रथमच येथे खुलेआम तिरंगा फडकाविला गेला आहे.

काश्मीर जाणकारांच्या मते ही असामान्य घटना आहे. याचवेळी बारामुल्ला येथे काश्मीर रक्षक शहीद मकबुल शेरवानी आणि सांबा शहीद ब्रिगेडीअर राजेंद्रसिंग यांच्या जन्मस्थळी सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. दल लेकमध्ये शिकारा रॅली झाली. स्थानिक लोकांनी तयार केलेले मेड इन काश्मीर तिरंगे यावेळी वापरले गेले.

विद्यापीठाचे उपकुलपती तलत अहमद यावेळी उपस्थित होते. काश्मीरचे जाणकार अहमद ली फैयाज म्हणाले विद्यापीठाच्या आत हॉल मध्ये काही वेळा तिरंगा फडकाविला जात असे तेव्हाही प्रचंड हंगामा केला जात होता. ७५ वर्षात प्रथमच विद्यापीठ परिसरात खुले आम तिरंगा फडकला आहे. अर्थात ३७० कलम हटविल्याचा हा परिणाम आहे.