टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चीनी करोना लसीला परवानगी नाही

जपानने टोक्यो ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच चीनला जोरदार दणका दिला आहे. जपानने चीनी करोना लस वापरण्यास परवानगी नाकारली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे आयओसीने जपानशी चर्चा न करताच चीनी करोना लस ऑलिम्पिक साठी येणाऱ्या खेळाडूंना देण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. पण जपान सरकारने हा प्रस्ताव अमान्य केला आहे.

ऑलिम्पिक मंत्री तामायो मारूकावा शुक्रवारी या संदर्भात बोलताना म्हणाले, आमचे खेळाडू चीनी लस घेणार नाहीत. या लसीला जपान मध्ये मान्यता मिळालेली नाही. जपान मध्ये फायझर आणि एस्ट्रोजेनेका लसीला परवानगी दिली गेली असून त्यांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करून घेणे ऑलिम्पिक मध्ये सामील होणाऱ्या खेळाडूंना बंधनकारक नाही असाही खुलासा त्यांनी केला. जपान करोना नियंत्रणासाठी सर्व उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जपान भारत आणि अमेरिकेच्या सहाय्याने लस उत्पादन वाढविण्यावर काम करत आहे. यात जॉन्सनच्या लसीच्या उत्पादनाचा समावेश आहे.