31 मार्चपासून सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द


पुणे – भाळवणी-भिगवण सेक्शनमध्ये रेल्वे प्रशासनाकडून नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाकरून धावणारी सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस यासाठी 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाला सोलापूर विभागात गती देण्यात येत आहे. हुतात्मा एक्सप्रेस 1 मार्च रोजी गाजावाजा करीत सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. पण, या गाडीला दहा दिवसांतच 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याने सोलापूरकरांची निराशा झाली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे.

दुहेरीकरणाच्या आणि विद्युतीकरणाच्या भाळवणी ते भिगवण सेक्शनदरम्यान कामासाठी 12 मार्च ते 31 मार्चदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणारी गाडी क्रमांक 01158 हुतात्मा-पुणे विशेष एक्सप्रेससह तीन गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

दरम्यान, 15 मार्च ते 1 एप्रिल 2019 पर्यंत गाडी क्रमांक 07613 पनकेल-नांदेड ही गाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 08519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस ही गाडी 12 मार्च ते 30 मार्च 2021 पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.