ठाकरे सरकारवर चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका


पुणे – देशासह राज्याची आर्थिक घडी कोरोनामुळे गतवर्षी झालेल्या लॉकडाऊमुळे विस्कटली असून, ती कोठे आता सुरळीत होत आहे. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील याच पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारला पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असे धोरण ठरवावे लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यायला हवा. तसेच लॉकडाऊन न करता निर्बंध घालायला हवे. त्याचबरोबर मॉल, हॉटेलमध्ये काही निर्बंध हवे.

त्याचबरोबर एमपीएससी आंदोलनावर बोलताना सरकारमध्ये बेबंदशाही आहे. आपापसात ताळमेळ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे महाविकास आघाडीचे सरकार एक नंबर लबाड सरकार आहे. तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटले म्हणून तुमच्यावर विद्यार्थ्यांनी का विश्वास ठेवायचा, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.