आयफोन १२ चे उत्पादन भारतात सुरु

अॅपल त्यांच्या आयफोन १२ चे उत्पादन भारतात सुरु करत असल्याची घोषणा गुरुवारी केली गेली आहे. यासंदर्भात स्थानिक ग्राहकात जगातील दोन नंबरच्या सर्वाधिक मोठ्या स्मार्टफोन बाजारात म्हणजे भारतात आयफोन १२ चे उत्पादन अभिमानाची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे उत्पादन कुठे केले जाईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. पण तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीच्या तामिळनाडू प्रकल्पात हे उत्पादन होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

अमेरिका चीन व्यापारी युद्धामुळे अॅपलने त्यांची उत्पादने चीन बाहेर अन्य देशात करण्याचा निर्णय घेऊन तश्या हालचाली सुरु केल्या आहेत. २०१७ पासून अॅपल भारतात आयफोन उत्पादन करत असून व्हीएतनामी कंपनी विस्ट्रोनच्या माध्यमातून हे उत्पादन केले जात आहे. फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि पेगाट्रोन मिळून पुढील पाच वर्षात भारतात ९० कोटी डॉलर्स किंमतीचे आयफोन उत्पादन करणार आहेत.

भारत सरकारने ६.७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या स्मार्टफोन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी वरील उत्पादन मदतगार ठरेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले भारताला मोबाईल आणि सुटे भाग हब बनविण्याची घोषणा सरकारने केली होती आणि त्यामुळे अनेक जागतिक कंपन्या भारताकडे आकर्षित झाल्या आहेत. याचा फायदा रोजगार वाढीसाठी होणार आहे.