पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ; तर 13 रुग्णांचा मृत्यू


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या चिंता आणखी वाढणार असून कारण आज दिवसभरात १५०४ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. आज पुण्यात कोरोनाच्या 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 6 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. तर दिवसभरात ६७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३५७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पुण्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,१३,०२५ वर पोहोचली आहे. पुण्यात सध्या ८५४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुण्यात आतापर्यंत एकूण ४९१७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतच एकूण १,९९,५६७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज ८५५३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

कोरोनाचा उद्रेक पुण्यात पुन्हा होताना दिसत आहे. याआधी पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे पुणेकरांनी जर अजूनही गांभीर्य दाखवले नाही, तर पुण्यात ही कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.