बीएमडब्ल्यूने सादर केली पहिली मेड इन इंडिया एम ३४० आय

जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी पहिली मेड इन इंडिया असेम्बल्ड कार एम ३४० आय ड्राईव्ह लाँच केली असून तिची किंमत आहे ६२.८० लाख रुपये. चेन्नई प्रकल्पात ही कार उत्पादित करण्यात आली. भारतात उत्पादन झाल्याने तिची किंमत कमी आहे असे समजते.

या कारसाठी ६ सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला फक्त ४.४ सेकंड लागतात. ८ स्पीड स्टेप्ट्रोनिक स्पोर्ट ऑटो ट्रांसमिशन असून एलईडी हेडलाईट लेसर लाईट्ससह दिले गेले आहेत. डे टाईम ड्राईव्हिंग लाईट रिंग्स, एल आकारात एलईडी टेल लाईट दिले गेले आहेत. तीन रंगात ही कार उपलब्ध आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग सेट अप, अटेंटीव्ह असिस्टंट ब्रेक असिस्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, डायनेमिक स्टॅबीलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरींग ब्रेक कंट्रोल असून ही कार प्रवासासाठी अतिशय आरामदायी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.