सूर्यकिरणांत सोनेरी होणारे शिवमंदिर

raisen
भोपाळ- मध्यप्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातल्या रायसेन या शहरात पहाडावर असलेले प्राचीन शिवमंदिर पाहायची संधी या महाशिवरात्रीला साधता येईल कारण फक्त महाशिवरात्रीदिवशी वर्षातून एकदाच या मंदिराचा गाभारा उघडला जातो. यंदा सोमवारी महाशिवरात्री आहे.

हे प्राचीन मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे पुरावे मिळतात. विशेष म्हणजे उंच पहाडावर असलेल्या या मंदिरातील खांबांवर जेव्हा सूर्याची कोवळी किरणे पडतात तेव्हा ते खांब सोन्याचे असल्यासारखे चमकतात. हे मंदिर पूणपर्ण दगडी बांधकामाचे आहे. भोलेनाथ मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर १२ व्या शतकातले असल्याचेही सांगितले जाते.

महाशिवरात्रीच्या दिवशीच या मंदिराचा गाभारा उघडला जात असल्याने त्या दिवशी येथे स्थानिक तसेच पर्यटकांचीही मोठी गर्दी होते. यंदाचा महाशिवरात्रीचा योग अत्यंत पवित्र आहे कारण त्या दिवशी सोमवार आहे, तसेच ध्वजयोग व विजययोगही आहेत. त्यामुळे येथे यंदा भरणार्‍या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment