शिवरात्र आणि महाशिवरात्र यामध्ये हा आहे फरक


फोटो सौजन्य अमरउजाला
भारतात २१ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या दिवशी देशभरातील शिवालयात भाविक एकच गर्दी करून भोलेबाबाचे दर्शन घेतील. शंकराला देवांचा देव म्हणून महादेव असे म्हटले जाते. हा एकमेव असा देव आहे ज्याची लिंगस्वरुपात पूजा होते. अर्थात काही ठिकाणी शंकराच्या मुर्तीचीही पूजा होते.

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी शिवरात्र असते. अनेक भाविक याला प्रदोष म्हणून या दिवशी उपास करतात. पण महाशिवरात्र फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला साजरी होते. याचे महत्व म्हणजे या दिवशी उपवास केला तर वर्षभर शिवरात्रीचा उपास केल्याचे पुण्य मिळते. महाशिवरात्रीलाचा महादेव लिंगस्वरुपात प्रकट झाले असे मानले जाते. हा दिवस शिव पार्वतीच्या विवाहाचा दिवस असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.

महादेवाचा आवडता वार आहे सोमवार. हा वार सोम म्हणजे चंद्राशी संबंधित आहे. महाशिवरात्रीदिवशी चंद्र सूर्याच्या जवळ असतो. महाशिवरात्रीला जलरात्री असेही म्हटले जाते. महादेवाचा आवडता महिना आहे श्रावण. या काळात शंकर महादेव पृथ्वीभ्रमण करतात आणि आपल्या भक्तांचे क्षेमकुशल जाणून घेतात असाही विश्वास आहे.

Leave a Comment