या वस्तूंना लिलावात मिळालेली किंमत ऐकून व्हाल थक्क

फोटो साभार रॉयटर

लिलावात कोणत्या वस्तू किती किमतीला विकल्या गेल्या याच्या बातम्या नेहमीच येत असतात. अर्थात लिलावात विकल्या जाणाऱ्या वस्तू काही खास महत्वाच्या असतात आणि त्यामुळेच त्यांना असाधारण किमती मिळतात हे खरे असले तरी बुटाच्या एका जोडीला ४० लाख रुपये मोजले गेले तर ते जोडे नक्कीच सामान्य नसणार हे उघड आहे.

दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटनचे पंतप्रधान असलेले विन्स्टन चर्चिल यांचे मखमली जोडे या लिलावात ४० हजार पौंड म्हणजे ४० लाख रुपयात विकले गेले. या जोड्यावर युध्द काळातील लीडर्सच्या नावांची आद्याक्षरे सोन्याच्या तारेने विणली केली आहेत. या मखमली जोड्यांबरोबर चर्चिल यांचा एक मोठा ब्रँडी ग्लास ही विकण्यात आला. २१ सेंटीमीटर उंचीच्या या ग्लासला १८३०० पौंड मिळाले.

लिलावापूर्वी या दोन्ही वस्तू म्हणजे मखमली जोडे १० ते १५ हजार पौंड आणि ग्लास ७ ते १० हजार पौंडात विकला जाईल असा अंदाज वर्तविला गेला होता. या दोन्ही वस्तू युके मधील एका खासगी संग्रहाकाने १९९८ मध्ये खरेदी केल्या होत्या असेही समजते.