बेल – एक औषधी वृक्ष

शिवपूजेत बेलपत्र म्हणजे बेलाचे पान फार महत्वाचे मानले जाते. शंकराचे बेलपत्र हे आवडते पत्र मानले गेले आहे. बेलाची झाडे भारतात सर्वत्र आढळतात. उंच वाढणारा बेलवृक्ष औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. बेलाची पाने, फळे औषधी गुणधर्माने युक्त आहेत. संशोधनातून सुद्धा ही बाब आता सिद्ध झालेली आहे.

बेलाची पाने कशाकशावर उपयुक्त आहेत याची माहिती येथे देत आहोत. विशेषतः मधुमेही लोकांना या पानांच्या सेवनाने फायदा होतो. ही पाने ज्वर म्हणजे ताप येत असेल तर गुणकारी आहेत. मधमाशी अथवा अन्य कीटकांनी चावा घेतला तर या पानांचा रस लगेच वेदना थांबवितो. तसेच बेलाची फळे सरबतात वापरली जातात. बेल फळांचा मुरंबा उष्णता कमी करणारा आहे.

बेलपत्रे अँटीऑक्सिडंट असून त्यात ए,सी, बी १, बी ६ आणि बी १२ जीवनसत्व आहे. रायबोफ्लोबिन, खनिजे, पोटॅशियम, आणि फायबर्स या पानात भरपूर प्रमाणात मिळतात.

बेलाच्या पानांचा वाटून चेहऱ्यावर लेप केला तर चेहरा ताजातवाना होतो शिवाय चेहऱ्यावरील डाग कमी होतात. केस गळण्याचे कमी होते आणि केस दाट, चमकदार बनतात. पानांच्या सेवनाने मधुमेह, रक्तातील कोलेस्टेरॉल, हृदयाच्या आजारांपासून सुटका होते. उन्हाळ्यात बेलफळाचे सरबत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. फळातील गर् काढून त्यात पाणी, लिंबू रस, पुदिना पाने आणि गरजेनुसार साखर घालून हे सरबत बनविले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही