इन्स्टाग्राम लाईट लाँच, टूजी, थ्रीजी युजर्ससाठी चांगली खबर

इन्स्टाग्राम युजर्स साठी एक चांगली खबर आहे. भारतासह जगभरातील १७० देशात फेसबुकने इन्स्टाग्राम लाईट लाँच केले असून स्लो इंटरनेटवर सुद्धा ते चालणार आहे. याचा सर्वाधिक फायदा टूजी, थ्रीजी युजर्सना होणार असून त्यांच्या फोनवर ते इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार आहेत. सध्या लाईट फक्त अँड्राईड फोनसाठी उपलब्ध असून ते डाऊनलोड करण्यासाठी २ एमबी स्पेस लागणार आहे.

भारतासह एशिया, आफ्रिका, लॅटीन अमेरिकेतील १७० देशात इन्स्टाग्राम लाईट लाँच केले गेले आहे. या देशांतील मोठ्या लोकसंख्येकडे हायस्पीड इंटरनेट चालेल असे फोन नाहीत. भारतात ४५ टक्के युजर्सकडे फोर जी पेक्षा टूजी, थ्रीजी फोन जास्त आहेत. हे युजर्स सुद्धा नवीन इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार आहेत. रेग्युलर इन्स्टाग्राम व्हर्जन डाऊनलोड करायला ३० एमबी जागा लागते. हायस्पीड इंटरनेट फोन नसेल तर इन्स्टाग्रामची पेजेस न उघडणे, व्हिडीओ फोटो चांगले न दिसणे असे प्रकार होतात.

या अडचणीवर लाईट व्हर्जन हा चांगला पर्याय असून स्लो इंटरनेट असले तरी इन्स्टाग्राम पेजेस, फोटो, व्हिडीओ पाहणे तसेच व्हीडीओ, रील्स बनविणे, अपलोड करणे युजर्सना शक्य होणार आहे.