TCL ने भारतात लाँच केला व्हिडिओ कॉलिंग करता येणार अँड्रॉयड टीव्ही


मुंबईः व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा भारतातील पहिला अँड्रॉइड ११ टीव्ही पी७२५ आज जागतिक टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने लाँच केला आहे. तसेच या टीव्ही सोबत ९८.६६ टक्के पेक्षा जास्त बॅक्टेरीया नष्ट करू शकणारी हाय एंड हेल्दी स्मार्ट एसीची ओकॅरीना सीरीज सुद्धा टीसीएल कंपनीने आज लॉन्च केली.

पी७२५ हा पहिला ४के एचडीआर टीव्ही असून तो अँड्रॉइड ११ वर चालतो, यात व्हिडिओ कॉलिंगची सुविधा असून, डॉल्बी व्हिजनचे अल्ट्रा व्हिव्हिड कलर्स एमईएमसी, डॉल्बी व्हिजन व अॅटमॉस, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, स्पीड आणि सिक्युरिटी अपडेट्स इत्यादी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या टीव्हीत ७०००+ अॅप्स आणि ७००,०००+ शो/ फिल्म्सचा एकाचवेळी अॅक्सेस करता येऊ शकणार आहे.

आपल्याला चुंबकाने जोडलेला व्हिडिओ कॉल कॅमेरा सहजपणे प्लग इन आणि प्ले करता येतो. गूगल ड्युओचा वापर करून मित्र व कुटुंबासह व्हिडिओ चॅट करण्यासह, ऑनलाइन वर्गात सहभागी होणे, घरूनच आरामात ऑफिससोबत कनेक्ट होणे सहज शक्य होते.

पी७२५ चे डॉल्बी व्हिजन हे आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून ते अविश्वसनीय ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर आणि डिटेलसह अल्ट्रा-व्हिव्हिड पिक्चर क्वालिटी प्रदान करण्यासाठी वाइड कलर गॅमट क्षमतांसह हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) ला जोडते. डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले अधिक व्हिव्हिड, वास्तविक पिक्चर दाखवतो. शार्प कॉन्ट्रास्ट, ट्रू ब्लॅक व शॅडो डिटेल्सची संगती सखोल दिसून येते.

हा टीव्ही अॅमेझॉनवर ४३ इंच , ५० इंच , ५५ इंच आणि ६५ इंच प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहेत. या टीव्हीची किंमत अनुक्रमे ४१ हजार ९९०, ५६ हजार ९९०, ६२ हजार ९९० आणि ८९ हजार ९९० रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.