1 एप्रिलपासून वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार


नवी दिल्ली: 1 एप्रिलपासून कामगार कायद्यात होणाऱ्या बदलानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. बऱ्याच काळापासून केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत. देशात 1 एप्रिल 2021 पासून नवीन वेतन संहिता लागू होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर या बदलाचा थेट परिणाम होईल. नवीन नियमांनुसार, आपला मूलभूत पगार एकूण सीटीसीच्या 50 टक्के असेल. यासह आपला पीएफ योगदान देखील वाढणार आहे. याशिवाय सातव्या वेतन आयोगाची पगारात अंमलबजावणी झाल्यानंतर तुमचा पगारही वाढेल.

आयोगाच्या शिफारशी 2014 मध्ये मान्य केल्या गेल्या, पण अद्याप त्या अंमलात आलेल्या नाहीत. लवकरच सरकार यावरही निर्णय देणार आहे. देशातील सुमारे 1 कोटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यात 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 58 लाख निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे.

आयोगाच्या शिफारशीनुसार सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये केले गेले आहे. याशिवाय क्लास-वन अधिकाऱ्याचा किमान पगार 56100 रुपये निश्चित करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन, भत्ते, पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली आहे.

नव्या Pay Matrix ची घोषणा सातव्या वेतन आयोगाने केली असून Pay Matrix सह, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस संपूर्ण करिअरच्या वाढीचे मूल्यांकन करू शकतील. नागरी कर्मचारी, संरक्षण दले आणि लष्करी नर्सिंग सर्व्हिससाठी स्वतंत्र Pay Matrix तयार केले गेले आहे. आता त्या आधारे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होईल. त्याशिवाय कमिशनने एक नवीन Pay Matrix देखील जाहीर केला आहे, ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीस संपूर्ण कारकिर्दीतील वाढीचे मूल्यांकन करू शकतील. यामध्ये सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र Pay Matrix तयार करण्यात आले आहे.

सरकारने या व्यतिरिक्त महागाई भत्ता आणि महागाई सवलत याचे तीन हप्ते लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे रोखलेले तीन हफ्ते लवकरात लवकर देण्यात येणार आहेत, अशी ग्वाही अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिली. तसेच त्यांना 1 जुलै 2021 पासून लागू असलेल्या प्रभावी दरावर हप्त्यांचा मोबदला दिला जाईल.