अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘सुर्यवंशी’बाबत महत्वाची घोषणा


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे दीर्घकालीन निर्बंधानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पुन्हा निर्माण होऊ लागले आहे. अशातच बॉलीवूडचे अनेक रखडलेले चित्रपट आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सिनेरसिकांना बऱ्याच नवीन चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. त्यातच बॉलीवूड खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचेही बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लक्ष्मी या चित्रपटानंतर त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान अशाच एका चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दलची ही माहिती समोर आली आहे.

येत्या २ एप्रिलला अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट रिलीज होणार होता. पण सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्या अनुषंगाने कडक केलेले निर्णय पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलल्याचे वृत्त बॉलिवूड हंगामाने दिले आहे.

त्यांच्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अक्षय कुमारसह संपूर्ण टीमने घेतला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहेत. ’सुर्यवंशी’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे. काही भागात संचारबंदी लागू असताना हा चित्रपट प्रदर्शित करणे योग्य ठरणार नसल्याचे या चित्रपटाच्या टीमने स्पष्ट केले आहे. नवीन रीलीज डेटबद्दल विचारलं असता सर्व टीमशी, गुंतवणूकदारांशी संवाद साधून या बद्दलचा निर्णय घेणार असल्याचं टीमने सांगितलं आहे.