‘हॉल ऑफ फेम’ साठी इंद्रा नुयी, मिशेल ओबामासह ९ महिलाची निवड

पेप्सिकोच्या माजी सीईओ भारत वंशीय इंद्रा नुयी, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, फुटबॉल खेळाडू मिया हम्म सह ९ महिलांची राष्ट्रीय महिला २०२१ ‘हॉल ऑफ फेम’ साठी निवड करण्यात आली आहे. यात इराक युद्ध काळात तैनात पहिल्या महिला कमांडर जनरल, निवृत्त ब्रिगेडीयर जनरल रेबेक्का हॅलस्टीड, कलाकार जोय हर्जो, कलाकार ज्युडी यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर या यादीत नासा गणितज्ञ दिवंगत कॅथरीन जॉन्सन, दिवंगत लेखिका अक्टाविया बटलर, महिला अधिकारी व शैक्षणिक समानता समर्थक दिवंगत एमिली हॉलंड यांचाही समावेश आहे. शिकागो येथे सेनेका फॉल्स आयोजित कार्यक्रमात या महिलांना हॉल ऑफ फेम मध्ये सामील केले जाणार आहे. याच ठिकाणी महिलांचे पाहिले संमेलन भरले होते.