पुण्यात खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी विकणाऱ्या मजुरांना अटक

पिंपरी चिंचवडच्या चिखली येथील दोन मजुरांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याची प्राचीन २१६ नाणी जप्त करण्यात आली आहेत. ही नाणी मुगलकालीन असून औरंगजेब शासन काळातील आहेत. ही नाणी २३५७ ग्राम वजनाची असून प्रत्येक नाण्याची वजनानुसार बाजारातील आजही किंमत ७० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी याना विठ्ठल नगर झोपडपट्टीत सद्दाम खान पठाण बाजारात सोन्याची नाणी विकण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर मिळताच त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि काही नाणी जप्त केली. सद्दामने त्याचे सासरे मुबारक व मेव्हणा इरफान शेख यांना बांधकाम साईटवर खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडल्याचे व ती विकण्यासाठी सद्दाम कडे दिल्याचे सांगितले.

ही नाणी १७२० ते १७५० काळात बनविली गेली असून त्यावेळी अशी नाणी जयपूर मध्ये बनत असत. त्यावर उर्दू आणि अरबी भाषेत मजकूर असून ही नाणी प्राचीन असल्याने अनमोल आहेत. ही नाणी पुरातत्व विभागाकडे सोपविली गेल्याचे सांगितले जात असून ज्या साईटवर ती सापडली तेथे शोध घेतला जात आहे.