कियाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार इव्ही ६ चा टीझर रिलीज

किया कार्पोरेशनने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार इव्ही ६ चा टीझर सादर केला आहे. नवीन इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म ईजीएमपीवर ही कार आधारित असून एक महिन्यापूर्वी टेस्टिंग सुरु असताना ती नजरेस आली होती. सोशल मिडियावरील जाहिरातीत १५ मार्च रोजी कारचा पूर्ण लुक सादर केला जाईल असे म्हटले गेले आहे.

किया ग्लोबल डिझाईन सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष करीम हबीब यांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना सहज, नैसर्गिक अनुभव प्रदान करण्याचे दृष्टीने ईव्ही ६ चे डिझाईन केले गेले आहे. दररोजचा प्रवास सुखकारक व्हावा असे त्यामागे प्रयत्न आहेत.

व्हिडीओ टीझर मध्ये कारचे स्लिक डिझाईन, स्लोपिंग रुफ, स्ट्रीमलाईन्ड बॉडीवर्क, फ्लश माउंटेड डोअर हँडल्स, रिअर विंडो, एलईडी हेडलाईट, युनिक ब्रेक लाईट, टर्न सिग्नल दिसत आहेत. कंपनी भविष्यातील त्यांच्या सर्व इलेक्ट्रिक कारची नवे इव्हीनेच सुरु करणार आहे. कारच्या अन्य स्पेसीफिकेशनचा खुलासा केला गेलेला नाही. ही कार एका चार्जमध्ये ४८० किमी धावेल असे सांगितले जात असून या वर्षाच्या अखेरी ती अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल असे समजते.