येत्या काही दिवसात होणार मुंबईच्या तापमानात वाढ


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मुंबईमध्ये मार्चच्या सुरूवातीला आद्रतेच्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईसह राज्यातील तापमान येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईसह राज्यात अधिक उकाडा जाणवणार आहे.

मुंबईच्या वातावरणात रविवारच्या तुलनेत सध्यातरी फारसा बदल झालेला नाही. अद्यापही रात्री थंड़ आणि दिवसा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सांताक्रूज येथे मुंबईचे कमाल तापमान 35.6 अंश तर कुलाबा येथे कमाल तापमान 32.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले आहे. दरम्यान मुंबईच्या आद्रतेतही घट झाली आहे. राज्यातील विविध परिसरातही कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात उकाडा वाढल्यास लोकांनी आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.