आजपासून ३१ मार्चपर्यंत ठाण्यातील १६ परिसरांमध्ये कडक लॉकडाउन


ठाणे – पुन्हा कोरोनाचा उद्रेक राज्यातील अनेक शहरांमध्ये होताना दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव ठाणे शहरातील काही भागातही झपाट्याने होत असून, कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असल्यामुळे ठाणे शहरातील काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून, या भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने टप्यापटप्याने लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली होती. पण, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, मुंबई-पुण्यासह मराठावाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दररोज वाढताना दिसत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या ठाणे महापालिका हद्दीतही वाढत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. या हॉटस्पॉटमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून (९ मार्च) लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश आयुक्तांनी काढले असून, हा लॉकडाउन सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउनप्रमाणेच कडक असणार आहे.

ठाणे शहरातील या परिसरांमध्ये असेल लॉकडाउन

  • आई नगर, कळवा
  • सूर्या नगर, विटावा
  • खारेगाव हेल्थ सेंटर
  • चेंदणी कोळीवाडा
  • श्रीनगर
  • हिरानंदानी इस्टेट
  • लोढा माजीवाडा
  • रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
  • लोढा अमारा
  • शिवाजी नगर
  • दोस्ती विहार
  • हिरानंदानी मिडोज
  • पाटील वाडी
  • रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
  • रुणवाल नगर, कोलबाद
  • रुस्तोमजी, वृंदावन