मोटोरोलाने भारतात लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन, किंमत 9 हजार 999 रुपयांपासून सुरू


नवी दिल्ली – भारतीय बाजारात मोटोरोला कंपनीने मोटो जी 30 आणि मोटो जी 10 Power हे दोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लाँच केले आहेत. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मोटोरोलाच्या या दोन्ही फोनमध्ये असून स्टॉक अँड्रॉईड 11 चा सपोर्ट आहे. शिवाय सुरक्षेसाठी यामध्ये ThinkShield या खास टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे.

मोटो जी 30 मध्ये अँड्रॉइड 11 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. मेमरी कार्डच्या मदतीने यातील स्टोरेजही 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. तसेच, फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे.

यातील चारही कॅमेरे अनुक्रमे 64 मेगापिक्सेल मेन लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, NFC, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळेल. शिवाय फोनमध्ये 20W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.

तर मोटो जी 10 Power मध्येही स्टॉक अँड्रॉइड 11 चा सपोर्ट असून 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. मेमरी कार्डद्वारे यातील स्टोरेजही 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. शिवाय या फोनमध्येही क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे.

यातील चारही कॅमेरे अनुक्रमे 48 मेगापिक्सेल मेन लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. शिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. शिवाय फोनच्या मागील बाजूला रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं आहे. मोटो जी 10 Power मध्येही कंपनीने 20W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.

भारतात मोटो जी 30 ची किंमत 10 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डार्क पर्ल आणि पास्टेल स्काय कलर अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये मिळेल. तर, मोटो जी 10 Power ची किंमत 9 हजार 999 रुपये असून हा फोनही 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये मिळेल. हा फोन ऑरोरा ग्रे आणि ब्रीज ब्लू अशा दोन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. 17 मार्चपासून मोटो जी 30 ची विक्री आणि मोटो जी 10 Power ची विक्री 16 मार्चपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुन होईल.