६ हजारांहून अधिक पदांसाठी ईएसआयसीमध्ये बंपर भरती


कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये (ESIC) ६ हजार ५०० हून अधिक पदांसाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. भारत सरकारची ही नोकरी मिळवण्याची बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून कोणत्याही विषयातील पदवीधरांपर्यंत तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. ग्रुप सीच्या पदांवर ही भरती केली जाईल. पे-स्केल ८१ हजार रुपये प्रति महिना आहे.

ही भरती प्रक्रिया अपर डिवीजन क्लर्क ते स्टेनोग्राफर या पदांसाठी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राजपत्रात यासंबंधीचे नोटिफिकेशन काढले आहे. ईएसआयसी अपर डिवीजन क्लर्क पदांसाठी ऑनलाइन चाचणीच्या आधारे निवड केली जाईल. ईएसआयसी स्टेनोग्राफरसाठी टायपिंग टेस्ट होईल.

या नोकरभरतीसाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे अनिवार्य आहे. ईएसआयसी स्टेनोग्राफर या पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून कोणत्याही विषयासह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफरसाठी उमेदवारांचा हिंदी आणि इंग्रजी टाइपिंग स्पीड ८० शब्द प्रति मिनिट असावा. सर्व पदांसाठी उमेदवारांचा किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अपर डिवीजन क्लर्क / अपर डिवीजन क्लर्क कॅशियरची ६,३०६ पदे, स्टेनोग्राफरची २४६ पदे, अशी एकूण ६५५२ पदे भरण्यात येणार आहेत. तर, यासाठी पे स्केल २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये प्रति महिनापर्यंत मिळू शकेल. या वेतन श्रेणीत टीए, डीए सह अन्य भत्ते जोडून वेतन मिळेल. लवकरच ईएसआईसीची वेबसाइट esic.nic.in वर या भरती संदर्भातील अर्जांची माहिती दिली जाईल.