राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात ३६ जणांना करोना
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात करण्यात आलेल्या करोना चाचण्यात ३६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विधानसभा कर्मचारी अधिक प्रमाणात आहेत. मुंबईच्या जेजे हॉस्पिटल मध्ये विधानसभा अधिवेशन लक्षात घेऊन ६ व ७ मार्च रोजी २७२६ लोकांचे नमुने तपासण्यात आले त्यातील ३६ करोना पोझिटिव्ह आहेत.
१ मार्च रोजी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक दिवस ३९०० लोकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यातही ४२ जण पोझिटिव्ह सापडले होते. त्यात २३ पोलीस आणि २ पत्रकार यांचाही समावेश होता. ६ व ७ तारखेला केल्या गेलेल्या चाचण्यात आमदार, त्यांचे कर्मचारी, सरकारी अधिकारी, पोलीस आणि पत्रकार यांचा समावेश होता.
गेले काही दिवस महाराष्टात करोना संक्रमण पुन्हा एकदा वेगाने वाढले असून सुमारे पाच महिन्यानंतर एका दिवसात ११ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. रविवारी १११४१ नवीन रुग्ण आढळले तर शनिवारी ही संख्या १० हजारांवर होती. राज्यात वीकएंड लॉकडाऊन लावला गेला असला तरी त्याचा फारसा परिणाम होताना दिसलेला नाही.