मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचे चित्रण पूर्ण

चांदनी बार, पेज ३, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन असे वेगळ्या विषयांवरचे आणि टीकाकारांची प्रशंसा मिळविलेल्या चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी त्यांच्या नव्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. या चित्रपटात प्रतिक बब्बर, सई ताम्हनकर, प्रकाश बेलवाडी, अहाना कुमरा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

करोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला त्याचे राष्ट्रव्यापी काय परिणाम झाले, त्याचा काय प्रभाव पडला या विषयावर हा चित्रपट आहे. याचे शुटींग पुणे, मुंबई येथे केले गेले आहे. मधुर भांडारकर यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाची निर्मिती हा एक संस्मरणीय अनुभव होता. २०१७ मध्ये राजकीय थ्रिलर ‘इंदू सरकार’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर भांडारकर यांचा हा पाहिला चित्रपट आहे.