अक्षयसोबत ‘राम सेतू’मध्ये झळकणार या अभिनेत्री?


लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘राम सेतू’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच प्रदर्शित झाले. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता आणखी दोन अभिनेत्री या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


नुकताच एक फोटो अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याच्यासोबत या फोटोमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसत आहेत. हा फोटो पाहून नुसरत आणि जॅकलिन अक्षयसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अक्षयने हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या चित्रपटाची टीम ही नेहमी एकत्र असते, ती टीम चांगली काम करते. राम सेतू चित्रपटाच्या कथेचे वाचन… या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी आता उत्सुक असल्याचे त्याने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.