तुम्ही पाहिला का खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दबंग लूक!


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आपला एक दमदार लूकमधील फोटो सोनाक्षीने शेअर करत डिजिटल विश्वात पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे. लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये सोनाक्षी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ती एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना या वेब सीरिजमध्ये दिसून येणार आहे.

सोनाक्षीने या वेब सीरिजमधील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनाक्षीने खाकी वर्दीतील फोटो पोस्ट करत महिलाशक्ती वर भाष्य केले आहे. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोत ती पोलिसांच्या वर्दीत रेल्वे रुळांच्या पटरीजवळ ती दंबग अंदाजात उभी आहे. या फोटोतील तिच्या नजरेचा रोख तिच्या भूमिकेविषय बरच काही सांगून जातो. या फोटोवरुन ती एका धडाकेबाज पोलिसाच्या रुपात पाहायला मिळणार हे कळून येते.


सोनाक्षीने फोट शेअर करत म्हटले आहे, महिला काय साध्य करु शकतात त्याला मर्यादा नाही. यात आपल्या सर्वांचा विश्वासच आहे की जो काळासोबत आणखी प्रबळ होत चालला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एक पायरी वर चढत आहोत….मुली कश्याप्रकारे हे साध्य करतात हे दाखवण्यासाठी उत्सुक असल्याचे कॅप्शन सोनाक्षीने फोटोला दिले आहे.

या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हासोबतच अभिनेता विजय वर्मा, गुलशन देवया आणि सोहम शहा यांच्या प्रमुख भूमिका असतील. या वेब सीरिजचे दिग्दर्शन रिमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी केले आहे. अद्याप तरी या वेब सीरिजचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सोनाक्षीचा दमदार अंदाज या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यासोबतच सोनाक्षी अजय देवगणच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत.