या स्पोर्ट्स अँकरशी विवाहबद्ध होणार बुम बुम बुमराह !


कधी, केव्हा व कुणाशी भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह लग्न करणार या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कारण या सर्व चर्चांना अखेर उत्तर मिळाले आहे. जसप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी सुट्टी घेतली. ही सुट्टी त्याने लग्नासाठी घेतल्याचे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये झळकल्यानंतर जसप्रीतची होणारी पत्नी कोण, या चर्चेत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन हिचे नाव आघाडीवर होते. पण, हे वृत्त अनुपमाच्या आईनं फेटाळून लावल्यामुळे पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण, अशीच चर्चा सुरू झाली.

मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत जसप्रीत बुमराह लग्न करणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तो गोवा येथे १४-१५ मार्चला लग्न करणार आहे आणि स्पोर्ट्स अँकर आणि मॉडल संजना गणेसन हिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे. लग्नाची सर्व तयारी झाली आहे.

संजना गणेसन ही मॉडल आणि अँकर असून स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत ती काम करत आहे. तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरिंग केले आहे. 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही तिने सूत्रसंचालन केले होते. पुण्यातील तिचा जन्म असून तिने सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून B.Techचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने त्यात गोल्ड मेडलही पटकावले आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केले.

संजनाने 2014 मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत प्रवेश केला होता. याशिवाय तिने Mtv चॅनेलवरील स्प्लिट्स व्हिला या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली होती. त्यानंर तिने आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम सुरू केले आणि तेथेच जसप्रीतसोबत तिची भेट झाली. या दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला अजूनही त्यांच्या मॅनेजर किंवा कुटुंबीयांकडून दुजोरा मिळालेला नाही.