राफेल विमाने बनविणाऱ्या कंपनीचे मालक डसॉल्ट यांचे अपघाती निधन

भारताला राफेल लढाऊ विमाने देणारी कंपनी डसॉल्टचे मालक, फ्रांसमधील अब्जाधीश आणि फ्रांस संसद सदस्य ओलीविअर यांचे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉ यांनी डसॉल्ट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. ओलीविअर यांनी वायुसेना कमांडर म्हणून देशसेवा केली आहे.

डसॉल्ट कंपनीच्या वारसांमध्ये ओलीविअर सर्वात मोठे होते, ते ६९ वर्षाचे होते. काही राजकीय कारणे आणि मतभेदांमुळे त्यांनी डसॉल्ट कंपनी संचालक पदावरून आपले नाव काढून घेतले होते. २०२०च्या फोर्ब्स धनकुबेर यादीत त्यांना त्यांचे दोन भाऊ आणि एक बहिण यांच्यासह ३६१ स्थान मिळाले होते. रविवारी ते त्यांच्या खासगी हेलीकॉप्टर मधून नॉर्मडी येथे सुटीसाठी जात असताना हा अपघात झाला.