या देशाने जारी केली जगातील पहिली १० लाखाची चलनी नोट

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाने जगात प्रथम १० लाख किमतीची नोट जारी केली आहे. भीषण आर्थिक संकटामुळे या देशावर ही वेळ आली आहे. शनिवारी महागाईवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी ज्या तीन नोटा जारी केल्या गेल्या त्यात या १० लाख बोलीवर चलनाच्या नोटेचा समावेश आहे. देशाच्या सेंट्रल बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडल वर देशात तीन नव्या नोटा जारी केल्याची माहिती दिली गेली आहे.

या देशातील नागरिकांवर भुकेने तडफडून मरण्याची पाळी आली असून प्रचंड महागाई झाली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रीतून या देशाची अर्थव्यवस्था चालत असे पण ही विक्री बंद पाडली आहे, त्यात अमेरिकेने या देशावर काही निर्बंध घातले आहेत आणि करोना संकटामुळे करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय बनली आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे.२०२१ मध्ये ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या देशातील रहिवासी पलायन करत असून ब्राझील, पेरू, इक्वाडोर या देशात शरणार्थी म्हणून आश्रय घेत आहेत असे समजते.