यंदाच्या महिला दिनासाठी ही थीम

आंतरराष्ट्रीय महिला दिवस आज म्हणजे ८ मार्च रोजी साजरा होत असून २०२१ च्या महिला दिनाची थीम ‘वूमन इन लीडरशिप, अॅन इक्वल फ्युचर इन कोविड १९ वर्ल्ड’ म्हणजे महिला नेतृत्व, कोविड १९ काळात जगात एक समान भविष्य अशी आहे. महिला दिनाची सुरवात १९०२ मध्ये झाली असली तरी थीम सह महिला दिन साजरा करण्याची सुरवात १९९६ साली संयुक्त राष्ट्र संघाने केली.

करोना काळात आरोग्य देखभाल कर्मचारी रुपात जगभरातील महिलांनी दिलेले योगदान ठळकपणे समोर आले असून त्या सन्मानार्थ या वर्षी वरील थीम ठरविली गेली असे समजते. दरवर्षी जी थीम असेल त्याप्रमाणे हा दिवस खास प्रकारे साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने त्या कार्यात सामील झालेल्या महिलांचा सन्मान केला जातो. शाळा, सरकारी कार्यालये, संस्था अश्या ठिकाणी हे कार्यक्रम केले जातात. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश महिला पुरुष समानतेबाबत महिलांच्यात जागृती व्हावी आणि महिला अधिकार, त्यांच्यासाठी असलेले कायदे नियम यांची माहिती त्यांना व्हावी हा आहे.