उरी बेस कॅम्पला विकी कौशलची भेट

सत्य घटनेवर आधारलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल राष्ट्रीय पारितोषिक मिळविलेल्या बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याने रविवारी प्रत्यक्षात उरी बेस कॅम्पला भेट दिली. त्याने या संदर्भात तीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. भारतीय सेनेतर्फे विकीला या भेटीचे निमंत्रण दिले गेले होते आणि त्यानुसार विकी तेथे गेला असे समजते.२०१९ मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक राष्ट्रीय पारितोषिके मिळाली होती.

विकीने फोटो खाली कॅप्शन लिहिताना,’ काश्मीर मधील उरी बेस कॅम्पला भेट देण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल भारतीय सेनेला धन्यवाद. या भागातील स्थानिक नागरिक आणि सेना जवानांच्या सोबत एक दिवस घालवायला मिळाला हाच माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. जयहिंद’ असे म्हटले आहे.

विकी सध्या उधमसिंग आणि सॅम माणेकशा या चित्रपटाच्या शुटींग मध्ये मग्न असून हे दोन्ही चित्रपट बायोपिक आहेत. या शिवाय विकी द ईमॉर्टल अश्वथामा आणि तख्त हे चित्रपट सुद्धा करतो आहे.