आयपीएल २०२१ मध्ये प्रथमच होणार काही गोष्टी

बीसीसीआयने ७ मार्च रोजी आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या मेगा टी २० लीग मध्ये यंदा प्रथमच काही गोष्टी घडणार आहेत. या लीगचे सामने ९ एप्रिल पासून सुरु होत असून अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. आयपीएलचा हा १४ वा सिझन आहे.

यंदाचे या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे सर्व टीम न्युट्रल व्हेन्यूवर खेळणार आहेत म्हणजे टीम होम ग्राउंडवर एकही सामना खेळणार नाहीत. यापूर्वी सुद्धा न्युट्रल व्हेन्युवर सामने खेळले गेले आहेत पण सर्व टीम होम ग्राउंड वर किमान एक सामना खेळत असे. यंदा ते होणार नाही. यंदा सहा शहरात हे सामने खेळले जात आहेत. गतवर्षी करोना मुळे ही स्पर्धा युएई मध्ये खेळविली गेली होती. यंदा प्रथमच इतक्या कमी शहरात सामने होणार आहेत. यात बंगलोर, चेन्नई, कोलकाता, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली या शहराचा समावेश आहे.

अंतिम सामना अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय आणि जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जाणार आहे. कोविड १९ साथीमुळे पहिल्या हाफ मध्ये सामने प्रेक्षकांशिवाय होणार आहेत मात्र दुसऱ्या हाफ मध्ये स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल असेही समजते.