खाकी ऐवजी सफेद वर्दी का घालतात कोलकाता पोलीस ?

police
सर्वसामान्यपणे आपल्या देशातील पोलीस एकसमान म्हणजे खाकी वर्दी घालतात. पण जर तुम्ही कधी कोलकात्याला गेलात, तर कदाचित तुम्ही पाहिले असेल की तेथील पोलीस पांढरी वर्दी घातलेले असतात. आपण कधी विचार केला आहे का जेव्हा देशभरातील पोलीस खाकी वर्दी घालतात, तेव्हा कोलकाता पोलिसांना पांढरा गणवेश का घालतात? तर त्यामागचे कारण आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
police1
ब्रिटिश काळापासून खाकी आणि पांढरे गणवेश आले आहेत. जेव्हा ब्रिटिशांच्या काळात पोलिसांची स्थापना झाली तेव्हा पोलिसांनी पांढरे गणवेश वापरले होते, परंतु जास्त वेळ काम केल्यानंतर ते खराब होत होते. त्यामुळे पोलिसांना गणवेश लवकर खराब होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश वापरण्यास सुरुवात केली.
police2
पांढ-या रंगाच्या वर्दीवर वेगळे-वेगळे रंग लागल्यामुळे पोलिसांचे गणवेष वेगवेगळ्या रंगात दिसू लागल्या. त्यामुळे नक्की पोलीस कोण हे ओळखणे कठीण होत होते. त्यावेळी या समस्येतून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खाकी-रंगाच्या वर्दी बनविल्या, जेणेकरुन ते लवकर खराब होणार नाहीत.
police3
ब्रिटीश अधिकारी सर हॅरी लम्सडेन याने पहिल्यांदा अधिकृतरित्या खाकी रंगाच्या वर्दीचा वापर करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ही खाकी वर्दी भारतीय पोलिसांची ओळख बनली, जी आजही चालू आहे. तुम्हाला माहित आहे की पश्चिम बंगालमधील पोलीस केवळ खाकी वर्दी वापरतात, पण कोलकात्यातील पोलीस पांढऱ्या वर्दीत असतात.
police4
त्यावेळी कोलकाता पोलिसांना खाकी वर्दीचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. यामागचे कारण म्हणजे कोलकाता हा तटीय क्षेत्र आहे आणि येथे भरपूर उष्णता व आर्द्रता आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीमुळे पांढरा रंग खुप चांगला आहे. कारण हा रंग सूर्यप्रकाशाला परावर्तित करतो आणि जास्त उष्णता दर्शवत नाही.

Leave a Comment