नाइट शिफ्ट करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

night-shift-work
हाँगकाँग –  नाइट शिफ्ट काम करताय तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याचा इशारा देणारी आहे. कारण नेहमीच रात्री जागरण करणे आणि नाइट शिफ्ट करणे किती घातक ठरू शकते यासंदर्भातील एक रिसर्च समोर आला आहे.
night-shift-work2
नाइट शिफ्ट करणाऱ्यांच्या डीएनएला नुकसान होऊ शकतो. झोप पूर्ण न करता काम करत राहिल्यास अशा लोकांच्या डीएनएचे जीन पुनरनिर्मित होण्याची क्षमता अतिशय कमी होत जाते. अॅनेस्थीसिया अकॅडमी जर्नलच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, जागरण करणाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सर (कर्करोग) इत्यादी आजार होण्याचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार, रात्री जागरण करून काम करताना डीएनएच्या पुनरनिर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि बिघडते. अशा लोकांच्या डीएनए पुनरनिर्मितीची प्रक्रिया सामान्य व्यक्तीच्या तुलनेत 30% कमी असते. तसेच रात्रभर काम करून सकाळी पुरेशी झोप नाही घेतल्यास हा धोका आणखी 25 टक्क्यांनी वाढत असतो.
dna
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे संशोधन 28 ते 33 वर्षे वयोगटातील निरोगी डॉक्टरांच्या ब्लड सॅम्पलवरून करण्यात आले आहे. त्या सर्वांना तीन रात्र जागे ठेवून रक्ताचा तपास करण्यात आला आहे. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्या डॉक्टरांच्या रक्तामध्ये डीएनएची पुनरनिर्मिती कमी झाल्याचे आणि त्यांचा डीएनए बिघडल्याचे समोर आले आहे. डीएनए बिघडल्यास कधीच बरे न होणारे रोग उद्भवतात. यावर जास्तीत-जास्त संशोधन करून तातडीने त्यावर उपचारांचा शोध घ्यायला हवा असे संशोधकांनी म्हटले आहे.
night-shift-work1
हाँगकाँग विद्यापीठातील संशोधक एसडब्लू चोई सांगतात की, डीएनए बिघडण्याचा अर्थ मानवी शरीर आणि अवयवांच्या मूळ रचनेत बदल घडून येणे होय. डीएनए बदलत असताना ते सामान्य होण्यासाठी पुनरनिर्मितीची गरज असते. परंतु, नाइट शिफ्ट करणाऱ्यांचा डीएनए पुन्हा निर्माण होईल एवढा शक्तीशाली नसतो. सामान्य व्यक्तीच्या शरीरात डीएनएमध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पुन्हा डीएनए निर्माण करत असतो. रात्री जागरण करून काम करणाऱ्यांच्या शरीरात तसे काही होत नाही. अशात कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment