94 वे मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय


नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये 94 वे साहित्य संमेलन पार पडणार होते. हा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला आहे.

साहित्य संमेलन यावर्षी कोरोनामुळे घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरवले होते. पण नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत गेला. डिसेंबरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली होती. त्यामुळे साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.