देवीरूपातील हनुमानाचे एकमेव मंदिर

hanuman
भारताच्या कानाकोपऱ्यात महाबली हनुमान मंदिरे आहेत. रामाचा परमभक्त आणि ब्रह्मचारी, संकटमोचन हनुमान शक्तीचे प्रतिक मानला जातो. छत्तीसगडमधील रतनपूर येथे हनुमानाचे देशातील एकमेव असे विशेष मंदिर असून येथे हनुमान नारीरुपात पुजला जातो. विलासपूर पासून २५ किमी अंतरावर हे गाव आहे.

या मंदिराचे विशेष असे सांगतात जो कुणी देवीस्वरूपातील या हनुमान मूर्तीचे दर्शन घेतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही हनुमान प्रतिमा १० हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. याची हकीकत अशी सांगतात कि रतनपूरचा राजा पृथ्वी देवजू यांनी हे मंदिर बांधले आहे. हा राजा कुष्ठरोगी होता. त्याला स्वप्नात हनुमान दर्शन झाले आणि हनुमानानी त्याला मी येथे आहे असा विश्वास दिला. तसेच नदीत मूर्ती आहे ती बाहेर काढ असा दृष्टांत दिला.

त्यानुसार राजाने नदीतून मूर्ती बाहेर काढली तेव्हा त्यातून प्रकाश येत होताच पण राजाला हनुमानाने नारी रुपात दर्शन दिले होते तशीच ही मूर्ती होती. राजाने तिची प्रतिस्थापना केली आणि राजाचा कुष्ठरोग बरा झाला. या मूर्तीचे रूप खुपच लोभस असून ती दक्षिणमुखी आहे. डाव्या खांद्यावर श्रीराम आणि उजव्या खांद्यावर लक्ष्मण असून पायाखाली दोन राक्षस आहेत. मंदिराजवळ राजाने तलाव बांधला असून त्याला गिरीजाबंद तलाव असे म्हणतात.

Leave a Comment