ऐतिहासिक विजयाची नोंद ; चौथ्या कसोटीसह टीम इंडियाने जिंकली कसोटी मालिका


अहमदाबाद – भारताने इंग्लंडचा चौथ्या कसोटीतही दारुण पराभव केला आहे. भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी भारताने घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने या सामन्यासोबतच चार सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे.

मैदानात चहापानानंतर उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिल्यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातेही उघडू शकला नाही. रोहित शर्माच्या हाती त्याला अश्विनने झेलबाद केले. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडसमोर पराभवाचे संकट निर्माण केले आहे. इंग्लंडची धावसंख्या २० षटकांनंतर ४० धावांवर ४ बाद अशी झाली होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडवर पराभवाचे संकट निर्माण केले.

तत्पूर्वी भारतीय संघाचा डाव ३६५ धावांवर संपुष्टात झाला. दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने केलेली जबरदस्त खेळी आणि वॉशिंग्टनच्या फलंदाजीमुळे भारताने १६० धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला, फक्त चार धावांनी त्याचे शतक हुकले. अक्षर पटेल आऊट झाल्यानंतर इशात शर्मा आणि सिराज यांनी एकामागोमाग एक विकेट गमावल्याने वॉशिंग्टन सुंदर शतक करु शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे ८९ धावांची आघाडी होती.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केले होते. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. पण अक्षर पटेल ४३ धावांवर असताना धावबाद झाला आणि त्याची अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडे १६० धावांची आघाडी घेतली आहे.

भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला. पंतने शतकी खेळी करताना वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने ६ बाद १४६ अशा कठीण अवस्थेतीतील भारताला तारलं. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १०१ धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ७ गडी बाद झाल्यानंतर २९४ धावांसह भारताने सामन्यात आघाडी घेतली होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केले होते.