मुलाच्या मिळकतीवर वृद्ध आई- वडिलांचाही समान अधिकार


नवी दिल्ली- जिल्हा सत्र न्यायालयाने पोटगीप्रकरणी एक महत्त्वाचा निर्णय देत म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीच्या मिळकतीवर केवळ त्याच्या पत्नी आणि मुलांचा अधिकार नसून वृद्ध आई-वडिलांचाही समान अधिकार असतो. पालक त्याच्या मिळकतीमध्ये समान भागीदार असतात. एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय तीस हजारी स्थित प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश कठपलिया यांच्या न्यायालयाने दिला आहे.

आपल्या पतीची कमाई दर महिना 50 हजारापेक्षा जास्त असून तिला आणि तिच्या मुलांना केवळ 10 हजार रुपये पोटगी दिली जात असल्याचे एका महिलेने म्हटले होते. पण, आपली महिन्याची कमाई 37 हजार रुपये असून त्यातून स्वतःचा पत्नी आणि दोन मुलांचा खर्च उचलावा लागतो. शिवाय आपल्या आई वडिलांचाही सांभाळ करावा लागत, असल्याचे पतीने म्हटले.

तथ्य तापसणीत त्यांच्या आयकर खात्यानुसार त्यांचे मासिक उत्पन्न केवळ 37 हजार रुपये आहे. रिपोर्टप्रमाणे आई वडिलांच्या सांभाळ व त्यांच्या आजारपणाचा खर्चगी तोच करतो. पण, पत्नीचे असे म्हणणे होते की तिच्या पतीचे अधिक कर्तव्य आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे आहे म्हणून तिची पोटगी वाढवावी. याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने पतीच्या पगाराचे सहा भाग केले. यातील दोन भाग त्याचे स्वतःचे, पत्नीची आणि मुलांचा प्रत्येकी एक एक तर आई वडिलांनाही प्रत्येकी एक असे भाग करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात म्हटले त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आपल्या पत्नी आणि मुलांना 12 हजार 500 रुपये द्यावे लागतील.