होंडाने सादर केली अत्याधुनिक सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड

होंडाने जपान मध्ये जगातील सर्वात आधुनिक सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड नावाने सादर केली आहे. जपान मध्ये सुरवातीला लिजंडची फक्त १०० युनिट रस्त्यावर आणली गेली असून या कारला लेव्हल ३ ऑटोनॉम्स ड्रायव्हिंग तंत्रज्ञान दिले गेले आहे. गल्ली बोळातून जाताना किंवा लेन बदल करताना अॅडप्टीव्ह ड्रायव्हिंग मॅनेज करण्याची या कारची क्षमता आहे.

देशातील ग्राहकला ऑटोनॉमस वाहनाचा अनुभव कसा येतो आणि ही वाहने प्रत्यक्ष वापरात किती व्यवहार्य ठरतात याचेही अध्ययन होंडा कडून केले जात आहे. ऑटोनॉमस वाहनात आत बसणाऱ्या व्यक्तीला नेहमीच सावध राहावे लागते हे लक्षात घेऊन होंडा लिजंडला आपत्कालीन स्टॉप फंक्शन दिले गेले आहे. ड्रायव्हरने हँडओव्हर आदेशाला प्रत्युत्तर दिले नाही तर हे फंक्शन कार्यरत होते. कार मधील मुख्य कॅमेरा युनिट सतत वाहतूक स्थिती ट्रेक करते.

या कार प्रारंभी लीजवर दिल्या जाणार असून कारची किंमत ११ मिलियन येन म्हणजे ७४ लाख रुपये आहे. लेव्हल तीन ऑटोनॉमस सध्या जगातील सर्वाधिक अॅडव्हान्स्ड टेक्निक आहे. सेल्फ ड्राईव्ह वाहनात ऑटोनॉमस साठी ० ते ५ रेटिंग दिले जाते. ५ लेव्हल फुल ऑटोनॉमस असून भविष्यात लेव्हल ५ मध्ये ड्रायव्हर साठी स्टिअरिंग किंवा कंट्रोल नसतील असे सांगितले जाते.