मोटो जी १० पॉवर आणि मोटो जी ३० भारतात

मोटो जी १० पॉवर आणि मोटो जी ३० पुढच्या आठवड्यात म्हणजे ९ मार्च रोजी भारतात दाखल होत असून फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता सेल सुरु होणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन बजेट रेंज मधील आहेत.

मोटो जी ३० साठी ६.५ इंची टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला गेला असून ४ आणि ६ जीबी रॅम व्हेरीयंट मध्ये ते मिळतील. १२८ जीबी स्टोरेज दिले गेले असून मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने ते वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला चार रिअर कॅमेरे असून प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा आहे. शिवाय ८ एमपीचा अल्ट्रावाईड, २ एमपीचे मॅक्रो व डेप्थ सेन्सर दिले गेले आहेत.

मोटो जी १० पॉवरची फिचर्स अजून स्पष्ट नाहीत. मात्र नुकत्याच लाँच केलेल्या जी १० प्रमाणेच ही फिचर्स असतील असे सांगितले जात आहे. या फोनसाठी सुद्धा ६.५ इंची डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, चार रिअर कॅमेरे आणि सेल्फी साठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल असे संकेत आहेत. दोन्ही फोन साठी ५ हजार एमएएच ची फास्ट चार्जिंग सुविधा असलेली बॅटरी आहे.