मांचीनील – हे आहे मृत्यूचे झाड

treeman
अतिशय देखणा, पाहताक्षणी आकर्षित करणारा, छोट्या हिरव्या सफरचंदाच्या आकाराच्या फळांनी लगडलेला एक सुंदर वृक्ष माणसाला मरणाच्या दारात नेणारा म्हणून प्रसिद्ध असून या वृक्षाचे नाव आहे मांचीनील. स्पॅनिश भाषेत त्याला अर्बोले डे ला मुरते असे नाव असून त्याचा अर्थ आहे मृत्यूचे झाड.

या वृक्षाची नोंद जगातील सर्वाधिक विषारी वृक्ष म्हणून गिनीज बुक मध्ये झाली आहे. त्यामुळे जेथे ही झाडे आहेत त्यांच्यावर धोकादायक, जवळ जाऊ नये, विषारी वृक्ष अश्या पाट्या लावल्या जातात. या झाडात अनेक प्रकारची घातक रसायने तयार होतात. त्यातही त्याचे फळ अतिशय विषारी आहे.

manchineel
या झाडाच्या सावलीत काही मिनिटे डुलकी काढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. फ्लोरिडा आणि कॅरेबियन सागर याच्या जवळ ही झाडे आढळतात. हे झाड ५० फुट उंच वाढते आणि त्याची पाने चमकदार आणि अंडाकृती असतात. फळे भयंकर विषारी असतात. या फळातील रसाचा एखादा थेंब जरी त्वचेवर पडला तर त्वचा फाटते आणि आग होते. फळे जाळून धूर केला तर डोळे जातात. पूर्ण फळ खाल्ले तर मृत्यू नक्की होतो. पावसात या झाडाच्या आश्रयाला चुकून कुणी गेले आणि पावसाचे पाणी या झाडावरून त्याच्या अंगावर पडले तर खाज आणि आग याने माणूस हैराण होतो.

Leave a Comment